महाराष्ट्रात बटाटा 1050 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल

पुणे । महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये बटाट्याची आवक सध्या सर्वसाधारणच असून, त्यास सरासरी 1050 ते 1800 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. बुधवारी (ता. 20) मुंबईतील कांदा व बटाटा मार्केटमध्ये बटाट्याची सर्वाधिक म्हणजे सुमारे 12 हजार 871 क्विंटल आवक झाली, त्यास 900 ते 1400 रुपये आणि सरासरी 1150 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी (ता. 20 सप्टेंबर) अकोल्यात बटाट्याची 870 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 1400 रुपये आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नाशिकमध्ये बटाट्याची 915 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 1400 रुपये आणि सरासरी 1250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जळगावमध्ये 350 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 1400 रुपये आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मांजरी पुणे येथे 47 क्विंटल आवक झाली, त्यास 1400 ते 1800 रुपये आणि 1600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बटाट्याची 1020 क्विंटल आवक झाली, त्यास 800 ते 1300 आणि सरासरी 1050 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चंद्रपुरात 340 क्विंटल आवक झाली, त्यास 1400 ते 1550 रुपये आणि सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. राहुरीत 55 क्विंटल आवक झाली, त्यास 1400 ते 2000 रुपये आणि 1700 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भुसावळमध्ये 41 क्विंटल आवक झाली, त्यास 1400 ते 1600 रुपये आणि सरासरी 1500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. साताऱ्यात बटाट्याची 120 क्विंटल आवक झाली, त्यास 1300 ते 1600 आणि सरासरी 1450 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोलापुरात 1452 क्विंटल आवक झाली, त्यास 1050 ते 1450 रुपये आणि सरासरी 1200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. अमरावतीमध्ये 870 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 1600 रुपये आणि सरासरी 1300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुण्यात 6739 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 1800 रुपये आणि सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Previous articleपुण्यात नवीन उडदाला सर्वाधिक 9850 रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव
Next articleतरुणाने ग्रामीण भागात कसा नावारुपाला आणला? दुधाचा पद्मालय ब्रँन्ड !