Banana Market Rate: महाराष्ट्राप्रमाणे लगतच्या गुजरात राज्यातही केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तिथेही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव असल्याने केळीच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. सध्या गुजरातमध्ये कच्च्या केळीला किती भाव मिळतो आहे, त्याची माहिती आपल्याकडील शेतकऱ्यांना व्हावी म्हणून आज आम्ही सुरत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला मिळालेले गेल्या 10 दिवसांचे भाव उपलब्ध करून देत आहोत.
प्राप्त माहितीनुसार, सुरत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसात आवक झालेल्या केळीच्या किमान भावात फार जास्त फरक पडलेला नाही. मात्र, कमाल भावात तब्बल 450 रूपये प्रतिक्विंटलची भाव वाढ झालेली आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत सुरत येथे केळीला किमान 1600 आणि कमाल 2750 रूपये, तर सरासरी 2175 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.
Banana Market Rate In Surat
सुरतमध्ये साधारण 10 दिवसांपूर्वी म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी केळीला 1500 ते 2300 रूपये, सरासरी 1900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 20 ऑक्टोबरला केळीला 1500 ते 2400 रूपये, सरासरी 1950 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 23 ऑक्टोबरला केळीला 1500 ते 2300 रूपये, सरासरी 1900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 25 ऑक्टोबरला तिथे केळीला 1500 ते 2200 रूपये, सरासरी 1850 रूपये प्रतिक्विंटलचा भाव कायम होता. 26 ऑक्टोबरला भावात आणखी थोडी सुधारणा झाली आणि केळीचे भाव 1600 ते 2500 रूपये, सरासरी 2050 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. 27 ऑक्टोबरला 1600 ते 2500 रूपये, ,सरासरी 2050 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. अशाच प्रकारे 28 ऑक्टोबरलाही 1600 ते 2500 रूपये, सरासरी 2050 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 30 ऑक्टोबरला आवक झालेल्या केळीला 1500 ते 2500 रूपये, सरासरी 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव कायम होता. मात्र, दिवाळीचे वेध लागल्याने नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने केळीच्या भावाने उसळी घेतली. 01 नोव्हेंबरला आवक झालेल्या केळीला 1600 ते 2600 रूपये, सरासरी 2100 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. तर 02 नोव्हेंबरला केळीचा किमान भाव 1600 आणि कमाल भाव 2750 रूपये, सरासरी 2175 रूपये प्रतिक्विंटल होता.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)