हिरव्या मिरचीची आवक घटली, दर 10 ते 40 रूपये प्रतिकिलो

पुणे । पावसाळी वातावरणामुळे राज्यभरातील हिरव्या मिरचीच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जेवढी काही आवक होत आहे, त्या मिरचीला 10 ते 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाला आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी (ता.22) मुंबईसारख्या राज्यातील सर्वात मोठ्या बाजार समितीत हिरव्या मिरचीची जेमतेम 14 क्विंटल आवक झाली. आवक घटल्याच्या स्थितीत तिथे मिरचीला 2500 ते 4000 आणि सरासरी 3250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मुंबईच्या तुलनेत पुण्यात मिरचीची आवक सुमारे 779 क्विंटलपर्यंत झाल्यानंतरही तिथे मिरचीचे दर तेजीतच राहिले. पुण्यात मिरचीला 2500 ते 4000 आणि सरासरी 3250 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नगरमध्ये मिरचीची 71 क्विंटल आवक होऊन 1000 ते 4000 आणि सरासरी 2750 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. श्रीरामपूरमध्ये 15 क्विंटल आवक होऊन 3000 ते 5000 आणि सरासरी 4000 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. भुसावळमध्ये 17 क्विंटल आवक होऊन 2000 ते 3000 आणि सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. जळगावमध्ये हिरव्या मिरचीची 30 क्विंटल आवक होऊन 1500 ते 2000, सरासरी 1800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोलापुरात 40 क्विंटल आवक होऊन 2000 ते 3500, सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. रत्नागिरीत 20 क्विंटल आवक होऊन 3500 ते 4000, सरासरी 3800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. राहत्यामध्ये मिरचीची 10 क्विंटल आवक होऊन 2000 ते 3000, सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मंचरमध्ये 46 क्विंटल आवक होऊन 1000 ते 4000, सरासरी 2500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

WhatsApp Group
Previous articleतरुणाने ग्रामीण भागात कसा नावारुपाला आणला? दुधाचा पद्मालय ब्रँन्ड !
Next articleराज्यात कांदा 1450 ते 2375 रूपये प्रतिक्विंटल