ज्वारी, बाजरी, मक्याची किमान आधारभूत किंमतीने 01 डिसेंबरपासून सुरू होणार खरेदी

Government Grain Procurement: शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून केंद्र सरकारकडून किमान आधारभूत किंमत खरेदी योजना दरवर्षी राबविली जाते. त्याअंतर्गत यंदाही राज्यात 01 डिसेंबरपासून ज्वारी, बाजरी, मका तसेच रागी यासारख्या भरडधान्याची किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी ठिकठिकाणी केंद्रे सुरु केली जाणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहणार आहे.

Grain procurement to start from December 01 at minimum base price

खरीप पणन हंगाम 2023/24 मध्ये केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती आधीच जाहीर केल्या आहेत. याशिवाय आधारभूत किंमतींचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने व त्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष उघडण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा, या हेतूने राज्यात खरेदी केंद्रे सुरु करण्याकरीता व त्याठिकाणी धानाची तसेच भरडधान्य प्रकारातील ज्वारी, बाजरी, मका व रागी यांची खरेदी करण्यासाठी शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाने संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय अन्न महामंडळाच्या समन्वयाने राज्य शासनाने कार्यवाही करावयाची असल्याने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (नाशिक) यांना राज्य शासनाचे अभिकर्ता म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खरेदी करण्यात आलेले धान तसेच सर्व प्रकारचे धान्य भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामांमध्ये साठविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना विकलेल्या धान्याचे चुकारे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार आहेत.

असा राहिल धान्य खरेदीचा कालावधी (खरीप)

● धान : 09 नोव्हेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024
● भरडधान्य : 01 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024

या भावाने खरेदी केले जाईल धान व भरडधान्य

● धान (साधारण एफएक्यू) : 2183 रूपये
● धान (अ दर्जा) : 2203 रूपये
● ज्वारी (संकरीत) : 3180 रूपये
● ज्वारी (मालदांडी) : 3225 रूपये
● बाजरी : 2500 रूपये
● मका : 2090 रूपये
● रागी : 3846 रूपये

WhatsApp Group
Previous articleराज्यातील कोणत्या बाजार समितीत मिळाला ? तुरीला 11,800 रूपये प्रतिक्विंटल भाव
Next articleरासायनिक खतांचा डोस निम्मे करूनही केळी उत्पादनात कशी झाली भरघोस वाढ ?