केळीला बऱ्हाणपुरमध्ये दिवाळीच्या दिवशी मिळाला ‘इतका’ चांगला भाव

Banana Market Rate : केळी हे आपल्या देशातील विविध सण-उत्सव तसेच धार्मिक विधी कार्यात सर्रासपणे वापरले जाणारे एक महत्वाचे फळ मानले जाते. दिवाळीचा सण आणि केळीचे तर अतूट नाते आहे. हिवाळ्याचे दिवस असले तरी दरवर्षी दिवाळीला केळीची मागणी वाढते आणि तिचे भाव सुद्धा तेजीत येतात. यंदाही सर्वदूर तशीच परिस्थिती असून, विविध ठिकाणी केळीला चांगले भाव मिळाले आहेत.

Banana fetched ‘so’ good price on Diwali in Barhanpur

खासकरून केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील जळगावसह रावेर, चोपडा तसेच लगतच्या मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर भागातील बाजार समित्यांमध्ये दिवाळीच्या दिवशी केळीला किती भाव मिळाला, त्याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. बहुतांश ठिकाणी मागणीच्या तुलनेत पाहिजे तसा पुरवठा नसल्याने केळी भावाची चांगली स्थिती दिसून आली. विशेषतः बऱ्हाणपूर येथील बाजार समितीत रविवारी (ता.12 नोव्हेंबर) नवती केळीला कमाल 2592 रूपये आणि किमान 1952 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. रावेर येथील बाजार समितीत नवती क्र.1 ला 2225 रूपये प्रतिक्विंटल, तर नवती क्र.2 ला 2025 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. चोपडा येथील बाजार समितीत कांदेबाग केळीला 2300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. जळगाव येथील बाजार समितीतही कांदेबाग केळीला 2310 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. एकूण स्थिती लक्षात घेता सर्व ठिकाणी 2000 रूपये प्रतिक्विंटलच्या पुढेच केळीला भाव होता.

बाजार समितीनिहाय केळीचे भाव (ता.12 नोव्हेंबर)

● बऱ्हाणपूर :
नवती- 1952 ते 2592 रु. प्रतिक्विंटल
● रावेर :
नवती नं.1- 2225 रू./ नवती नं.2- 2025 रू. प्रतिक्विंटल
● चोपडा :
कांदेबाग- 2300 रू. प्रतिक्विंटल
● जळगाव :
कांदेबाग- 2310 रू. प्रतिक्विंटल

WhatsApp Group
Previous articleराज्यात 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर ‘महारेशीम अभियान-2024’ राबविण्यात येणार
Next articleकमी खर्चाच्या तीनचाकी मिनी ट्रॅक्टरने पैसा, मजुरी, श्रमात केली बचत