Pomegranate Market : डाळींब हे सर्वसाधारणपणे हलक्या जमिनीत आणि अतिशय कमी पाण्यावर घेता येणारे फळपीक आहे. राज्यातील सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, धुळे, बुलडाणा, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने डाळिंबाची व्यापारी शेती केली जाते. अशा फळाला सध्या मुंबईसह पुण्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोन्याचे भाव मिळत आहेत. विशेषतः पुण्यात गेल्या सप्ताहात डाळिंबाच्या फळांनी चांगलेच नाव कमावले आहे.
The price of gold that pomegranate got in Mumbai-Pune market committee
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी म्हणजे 06 नोव्हेंबरला पुण्यात लोकल डाळिंबाची फक्त 4 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 15,000 ते 20,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. मुंबईत डाळिंबाची 120 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 8,000 ते 16,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 07 नोव्हेंबरला पुण्यात भगव्या वाणाची 124 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 10,000 ते 35,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. मुंबईत गणेश वाणाची 829 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 8,000 ते 15,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. 08 नोव्हेंबरला भगव्या वाणाची 70 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 10,000 ते 35,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. मुंबईतही डाळिंबाची 688 क्विंटल आवक झाली, त्यास 8,000 ते 15,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. 09 नोव्हेंबरला पुण्यात डाळिंबाच्या भगव्या वाणाची 64 क्विंटल आवक झाली आणि त्यास 12,000 ते 37,500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. मुंबईतही डाळिंबाची 360 क्विंटल आवक झाली आणि त्यास 8,000 ते 16,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. 10 नोव्हेंबरला पुण्यात डाळिंबाच्या लोकल वाणाची फक्त 5 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 10,000 ते 12,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. मुंबईत गणेश वाणाची 199 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 8,000 ते 16,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. 11 नोव्हेंबरला मुंबईत गणेश वाणाची 270 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 10,000 ते 18,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. 13 नोव्हेंबरला पुण्यात डाळिंबाच्या लोकल वाणाची 3 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 10,000 ते 15,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. मुंबईतही डाळिंबाची 32 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 10,000 ते 16,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता.