Crime News : वावडदा शिवारात शेतमजुराचा खून करणारे दोन्ही तरूण आरोपी अखेर जेरबंद

Crime News : जळगाव तालुक्यातील वावडदा शिवारात रात्री राखणदारी करणाऱ्या मजुराचा निर्घूण खून करून अज्ञान चोरट्यांनी रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना बुधवारी (ता.15 नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही तरूण गुन्हेगारांना मध्यप्रदेशातून जेरबंद केले आहे. पवन बारेला (वय 30) रा. बाघाड, जि.बडवाणी आणि बावरसिंग बारेला (वय 28) रा. सालीकल, जि. बडवाणी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

The two youths who killed the farm laborer were finally jailed

बिलवाडी येथील मूळ रहिवासी असलेले शेतकरी ईश्वर मन्साराम पाटील यांची वावडदा शिवारात म्हसावद रस्त्याला लागूनच शेती आहे. त्याठिकाणी मंगळवारी (ता.14) रात्री शेतीमालाची व पशुधनाची राखणदारी करण्याच्या उद्देशाने बिलवाडी येथील रहिवासी मजूर पांडुरंग पंडित पाटील (वय 52) हे झोपलेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास पवन बारेला व बावरसिंग बारेला यांनी शेतकरी पाटील यांचा घटनास्थळी उभा केलेला ट्रॅक्टर चोरून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बाजुलाच झोपलेले मजूर पांडुरंग पाटील यांना जाग आली आणि त्यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, चोरट्यांनी ट्रॅक्टरचा डाबर त्यांच्या डोक्यात घातला. वर्मी घाव लागल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पांडुरंग पाटील जागीच मृत्युमुखी पडले होते. दरम्यान, चोरट्यांनी मजुराचा जीव घेतल्यानंतर रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर म्हसावद गावाकडे पळवून नेले. परंतु, वाटेतच ते बंद पडल्याने त्यांनी तिथेच सोडून दिले होते. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांनी तातडीने सूत्र फिरवली. पोलिसांची पथके तयार करुन तपासाला गती दिली. शेवटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातून दोन्ही संशयितांना शिताफीने अटक करण्यात पोलिसांना यश आले.

WhatsApp Group
Previous articleBanana Rate : केळीला आझादपूरच्या मंडईत दिवाळीत मिळाला सर्वाधिक 3500 रू प्रतिक्विंटलचा भाव
Next articleCotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समितीत 7,500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला