Cotton Rate : राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवाळीच्या काळात कापसाची आवक मंदावली होती. मात्र, दिवाळीची धामधूम आटोपताच कापसाची आवक वाढली असून, विशेषतः मराठवाड्यात कापसाला 7500 रूपये प्रतिक्विंटलपर्यंतचा भाव सुद्धा मिळाला आहे.
Cotton fetched a price of Rs 7,500 per quintal
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (ता.16 नोव्हेंबर) राज्यातील बाजार समित्यांमध्ये लोकल, मध्यम धागा, एच-4 मध्यम धागा या दर्जाच्या कापसाची सुमारे 6,918 क्विंटल आवक झाली. पैकी विदर्भातील वर्ध्यात मध्यम स्टेपल कापसाची सर्वाधिक 2200 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 7451 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. याशिवाय एच-4 मध्यम स्टेपल कापसाची 826 क्विंटल आवक झाली, त्यास 7100 ते 7250 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. बुलडाण्यात लोकल कापसाची 900 क्विंटल आवक झाली, त्यास 7100 ते 7300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. चंद्रपुरातही लोकल कापसाची 816 क्विंटल आवक झाली, त्यास 7100 चे 7271 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नागपुरात मध्यम स्टेपल कापसाची 1000 क्विंटल आवक झाली, त्यास 6900 ते 6950 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर लोकल कापसाची 113 क्विंटल आवक झाली, त्यास 7020 ते 7070 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. नांदेडमध्ये मध्यम स्टेपल कापसाची 34 क्विंटल आवक झाली, त्यास 6800 ते 7100 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. परभणीत लोकल कापसाची 850 क्विंटल आवक झाली, त्यास 7100 ते 7500 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)