Indian Railways : अमरावती-पुणे फेस्टीवल स्पेशल रेल्वेगाडीला मिळाली इतकी मुदतवाढ

Indian Railways : दिवाळीच्या सुटीत रेल्वेगाड्यांमध्ये होणारी अलोट गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अमरावती ते पुणे फेस्टीवल स्पेशल गाडी सुरू केली होती. या गाडीला प्रवाशांची गर्दी कायम असल्याने आणखी काही दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

Amravati-Pune Festival Special train got such an extension

पुणे ते अमरावती (01439) या फेस्टीवल स्पेशल रेल्वेला 17 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी आणि रविवारी सोडण्याचे नियोजन होते. मात्र, सदरची गाडी आता 01 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. म्हणजे आणखी 04 फेऱ्या या गाडीच्या होणार आहेत. याशिवाय अमरावती ते पुणे (01440) ही रेल्वेगाडी 18 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी आणि सोमवारी सोडण्याचे नियोजन होते. मात्र, नवीन नियोजनानुसार सदरची गाडी आता 02 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. म्हणजे आणखी 04 फेऱ्या या गाडीच्या होणार आहेत. दोन्ही बाजुने धावणाऱ्या गाड्यांना मुदतवाढ मिळालेली असली तरी त्यांचे सुटण्याचे दिवस, वेळा आणि थांबण्याची ठिकाणे यात कोणताच बदल मध्ये रेल्वेकडून करण्यात आलेला नाही. दोन्ही गाड्यांची आगावू तिकीट विक्री संगणकीकृत बुकींग काऊंटरवर सुरू आहे. तसेच रेल्वेच्या http://www.irctc.co.in या संकेतस्थळावरही तिकीट बुकींगची सोय उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES ऍप डाऊनलोड करून घ्या, असे मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

WhatsApp Group
Previous articleJalgaon News : जळगावात शासकीय योजनांचा जागर करणाऱ्या विकसित भारत संकल्प यात्रेला सुरूवात
Next articleCotton Rate Today : दिवाळीनंतर कापासाला 7000 रूपये प्रतिक्विंटलच्या पुढेच बाजारभाव