Cotton Rate Today : दिवाळीनंतर राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणारी कापसाची आवक थोडी मंदावली आहे. मात्र, कापसाच्या बाजारभावात काहीअंशी सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यात कापसाला अपवाद वगळता सर्वदूर 7000 रूपये प्रतिक्विंटलच्या पुढेच सध्या भाव मिळत आहे. दरम्यान, बहुतांश शेतकरी सावध पवित्रा घेऊन सध्या तरी घरातील कापूस विक्रीची घाई करत नसल्याने बाजारात कापसाच्या खरेदी-विक्रीला म्हणावी तशी चालना अद्याप मिळालेली नाही.
After Diwali, the market price of cotton is close to Rs 7000 per quintal
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (ता. 23 नोव्हेंबर) नागपूर, वर्धा, परभणी, यवतमाळ जिल्ह्यात कापसाची एकूण सुमारे 6351 क्विंटल आवक झाली होती. त्यापैकी राळेगाव येथील बाजार समितीत कापसाची सर्वाधिक 3500 क्विंटल आवक झाली आणि त्यास 7000 ते 7180 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. खालोखाल मनवत येथील बाजार समितीत कापसाची 1100 क्विंटल आवक झाली आणि त्यास 7100 ते 7325 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मारेगाव बाजार समितीत कापसाची 768 क्विंटल आवक झाली आणि त्यास 6950 ते 1750 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सिंदी (सेलू) बाजार समितीत कापसाची 400 क्विंटल आवक झाली, त्यास 7150 ते 7201 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. उमरेडमध्ये 337 क्विंटल आवक झाली, त्यास 7030 ते 7110 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. काटोल बाजार समितीत कापसाची 86 क्विंटल आवक झाली, त्यास 7000 ते 7100 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पारशिवनी येथील बाजार समितीत कापसाची 160 क्विंटल आवक झाली, त्यास 6900 ते 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)