Jalgaon News : जळगावात कामगारांसाठी साकारणार 5425 चौ.मीटर जागेत भव्य रूग्णालय

Jalgaon News : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रूती म्हणून जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ESIC) रूग्णालय औद्योगिक वसाहतीत सुमारे 5425 चौरस मीटर जागेत साकारणार आहे. सदरची प्रशस्त जागा फक्त 1 रूपया चौरस मीटर दराप्रमाणे उपलब्ध झाली असून, त्यामुळे ESIC रूग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

A 5425 sq. meter hospital will be constructed for workers in Jalgaon

जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त शासकीय रूग्णालय असावे, अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेत पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांना ESIC रूग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आमदार श्री. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी श्री. प्रसाद तसेच प्रांताधिकारी श्री. महेश सुधळकर यांच्या समावेश असलेल्या पाच सदस्यांच्या समितीने पुढाकार घेत सप्टेंबर महिन्यात जागेचा शोधही घेतला होता. अखेर एमआयडीसीतील बऱ्याच जागांची पाहणी करून कामगार रूग्णालयासाठी भूखंड क्रमांक 21694 मधील 5425 चौरस मीटर जागेची निवड करण्यात आली. एमआयडीसी कार्यालयाकडे रितसर प्रस्ताव सुद्धा पाठविण्यात आला. त्या प्रस्तावाचा शासन पातळीवर उद्योग मंत्रालयाकडे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री श्री. गिरीष महाजन यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे एमआयडीसीने रूग्णालयांसाठी 1 रूपया चौरस मीटर प्रमाणे जागा उपलब्ध करून दिली.

राज्य कर्मचारी विमा महामंडळाकडे जागा हस्तांतरित होणार

सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबर 2023 रोजी जळगाव एमआयडीसीचे क्षेत्रीय व्यवस्थापक वासुदेव सपकाळे यांनी राज्य कर्मचारी विमा महामंडळ, मुंबई यांना रूग्णालयासाठी जागा ताब्यात घेण्याबाबतचे पत्रही पाठविले आहे. औद्योगिक विकास महामंडळाने घेतलेला निर्णय ईएसआयसी रूग्णालयासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे महसूल, कामगार महामंडळ, ईएसआयसी प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांनी दिली.

WhatsApp Group
Previous articleCotton Rate Today : दिवाळीनंतर कापासाला 7000 रूपये प्रतिक्विंटलच्या पुढेच बाजारभाव
Next articleBanana Rate : उद्या शुक्रवारी (ता. 24 नोव्हेंबर) असे असतील केळीचे भाव