Central Railway : भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाने प्रवास भाड्याव्यतिरिक्त नॉन फेअर जाहिरातींच्या माध्यमातून एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत तब्बल 54.51 कोटी रूपयांची कमाई केली आहे. ही एकूण 05 उपविभागांची एकत्रित कमाई असून, जाहिरातदारांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मध्ये रेल्वेला आपले लक्ष्य गाठणे सहज शक्य झाले आहे.
Central Railway earned ‘so many’ crores of rupees through advertisements
रेल्वेगाड्यांच्या कोचवर विनाईल रॅपिंग तसेच रेल्वे स्थानकांवर होर्डिंग स्वरूपातील जाहिराती झळकावून, टीव्ही स्क्रीनवर जाहिराती दाखवून मध्य रेल्वेने व्यावसायिक आणि प्रवाशी यांच्यातील अंतर कमी केले. लहान व मोठ्या व्यवसायांना त्यामाध्यमातून चांगल्या संधी निर्माण केल्या. प्रवासी भाड्याच्या व्यतिरिक्त फक्त जाहिरातींच्या माध्यमातून मोठा महसूल जमा करण्याचे एक माध्यम मध्य रेल्वेला मिळाले असून, त्याचा पुरेपुर लाभ रेल्वेच्या या विभागाने गेल्या सहा महिन्यांच्या कालखंडात घेतला आहे. प्रवासी सेवा आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योगदान देतानाच प्रवासी भाड्याशिवाय जाहिरातींमधून मिळणाऱ्या महसुलाच्या वाढीसाठी मध्य रेल्वेला मोठी संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे नावीन्यपूर्ण जाहिरात धोरण शोधण्यासाठी वचनबद्ध देखील आहे. दरम्यान, मध्य रेल्वेला जाहिरातींच्या माध्यमातून मिळालेल्या कमाईच्या विभागणीत मुंबई विभाग सुमारे 46.44 कोटी रूपयांच्या कमाईसह अव्वल राहिला आहे. खालोखाल पुणे विभागाने 5.25 कोटी रूपयांची कमाई साध्य केली आहे.
मध्य रेल्वेला विभागनिहाय जाहिरातींमधून मिळालेली कमाई (कोटी रूपये)
■ कोचवरील विनाईल रॅपिंग : मुंबई- 7.31 कोटी, भुसावळ- 0.06 कोटी, नागपूर- 0.0 कोटी, सोलापूर- 0.01 कोटी, पुणे-0.81 कोटी.
■ स्थानकांवरील होर्डिंग : मुंबई- 23.64 कोटी, भुसावळ- 0.27 कोटी, नागपूर- 0.67 कोटी, सोलापूर- 0.45 कोटी, पुणे- 3.58 कोटी.
■ टीव्ही स्क्रीनवरील जाहिराती : मुंबई- 15.49 कोटी, भुसावळ- 0.60 कोटी, नागपूर- 0.38 कोटी, सोलापूर- 0.40 कोटी, पुणे- 0.86 कोटी.