Mahaparinirvana day : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने नागपूर ते मुंबई तसेच मुंबई/दादर ते सेवाग्राम/नागपूर, कुलबर्गी ते मुंबई, सोलापूर ते मुंबई आणि अजनी ते मुंबई दरम्यान 14 विशेष परंतु अनारक्षित गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन केले आहे.
Special unreserved trains will run from Nagpur to Mumbai on the occasion of Mahaparinirvana day
नागपूर ते मुंबई दरम्यानच्या अनारक्षित विशेष 03 फेऱ्यांच्या नियोजनानुसार, विशेष ट्रेन क्र. 02162 ही नागपूर येथून दि. 4.12.2023 रोजी 23.55 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी 15.30 वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्र. 01264 ही 05 डिसेंबर रोजी नागपूर येथून 08.00 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी 23.45 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01266 ही 05 डिसेंबर रोजी नागपूर येथून 15.50 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल. तिन्ही गाड्या नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांवर थांबतील. या गाड्यांना 12 ते 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडले जातील.
मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष 06 फेऱ्यांच्या नियोजनानुसार, विशेष ट्रेन क्र. 01249 ही 06 डिसेंबर रोजी 16.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून निघेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी 09.30 पोहोचेल. विशेष ट्रेन क्र. 01251 ही 06 डिसेंबर रोजी 18.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्र. 01253 ही 07 डिसेंबर रोजी (06 तारखेला मध्यरात्री) दादर येथून 00.40 वाजता निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी 15.55 वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्र. 01255 ही 07 डिसेंबर रोजी 12.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 03.00 वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्र. 01257 ही 08 डिसेंबर रोजी 18.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून निघेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 12.10 वाजता पोहोचेल. विशेष ट्रेन क्र. 01259 ही 08 डिसेंबर रोजी दादर येथून 00.40 वाजता निघेल आणि अजनी येथे त्याच दिवशी 15.55 वाजता पोहोचेल. सर्व गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर स्थानकावर थांबतील. सर्व गाड्यांना 12 ते 16 सामान्य श्रेणीचे डबे जोडले जातील.
अजनी ते मुंबई वन-वे अनारक्षित विशेष (01फेरी) नियोजनानुसार, स्पेशल ट्रेन क्र. 02040 ही अजनी येथून 07 डिसेंबर रोजी 13.30 वाजता निघेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 04.10 वाजता पोहोचेल. ही गाडी अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावर थांबेल. तिला 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे जोडले जातील.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)