मुंबई बाजार समितीत केळीला शुक्रवारी (ता.1 डिसेंबर) मिळाला 3500 रूपये प्रतिक्विंटल भाव

Banana Market Rate : राज्यात सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कच्च्या केळीची आवक विस्कळीत झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे नियमित आवकेवर परिणाम झाल्याने कधी केळीचा तुटवडा तर कधी मुबलक उपलब्धता अशी स्थिती निर्माण झाल्याने मुंबईत उत्तम दर्जाच्या केळीला सध्या 3500 रूपये प्रतिक्विंटलपर्यंतचा भाव सुद्धा आहे.

On Friday (December 1), the price of banana was Rs. 3500 per quintal in the Mumbai Market Committee.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबईत आठवडाभरापूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबरला राज्यभरातून केळीची 42 क्विंटलपर्यंत आवक झाली होती आणि भाव 2000 ते 3100 रूपये प्रतिक्विंटल मिळाला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबरला मुंबईत केळीची आवक वाढून 216 क्विंटलपर्यंत पोहोचली होती. परंतु, ग्राहकांची मागणी चांगली राहिल्याने केळीला 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. तीन दिवसांच्या खंडानंतर 28 नोव्हेंबरला मुंबईत केळीची जेमतेम 10 क्विंटलपर्यंतच आवक झाली. त्या दिवशी मागणीनुसार पुरवठा नसल्याने केळीला 2100 ते 3400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव देखील मिळाला. 30 नोव्हेंबरला पुन्हा मुंबईतील केळीची आवक वाढून 120 क्विंटलपर्यंत पोहोचली, तरीही तिथे केळीला 2000 ते 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. आज शुक्रवारी (ता.01 डिसेंबर) देखील मुंबईत केळीची आवक घटून 14 क्विंटलपर्यंत खाली आली होती. त्यामुळे केळीला 2000 ते 3500 रूपये व सरासरी 2700 रूपये प्रतिक्विंटलचा भाव तिथे मिळाला.

WhatsApp Group
Previous articleगायीच्या 3.2 फॅट / 8.3 टक्के एसएनएफ दुधाच्या खरेदीचे नवीन धोरण लागू
Next articleतरूणांमध्येच शेती क्षेत्रात परिवर्तन करण्याची ताकद : कृषी आयुक्त डॉ. प्रविण गेडाम