Crop Insurance : राज्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहू नये म्हणून कृषी मंत्रालयाने केंद्र सरकारकडे योजनेतील सहभागाची मुदत वाढवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. याशिवाय वैयक्तिक खुद्द कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे केंद्राने पीकविम्याचे अर्ज भरण्यास दोन दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.
Did the farmers get crop insurance? The extension is only for two days
केंद्र सरकारने मुदतवाढ दिल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील फळ बागायतदार शेतकरी तसेच रब्बीचा हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभागी होण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. केंद्राने मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना सोमवारी (ता.4) तसेच मंगळवारी (ता.5) पीकविम्याचा अर्ज दाखल करता येणार आहे. कारण, दोन्ही दिवस संबंधित वेबसाईट सुरू ठेवण्यात येणार आहे. पीकविमा योजनेत अर्ज दाखल करण्यासाठी मिळालेल्या मुदतवाढीमुळे राज्यातील संत्री, काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात ज्वारीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेत अर्ज दाखल करता येणार आहे. पीकविमा योजनेची वेबसाईट बंद झाल्यापासून अनेक शेतकरी अर्ज भरू शकलेले नव्हते. मुदतवाढीची सोय उपलब्ध झाल्याने पीकविम्यापासून वंचित राहिलेले शेतकरी आता अर्ज भरू शकणार असून, प्रतिकूल हवामानात त्यांच्या पिकांना पुरेसे विमा संरक्षण मिळणार आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)