मिचौंग चक्रीवादळाचा परिणाम; विदर्भासह मराठवाड्यात आज पावसाचा इशारा

Cyclone Michaung : दक्षिण भारतात थैमान घालणाऱ्या मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भ तसेच मराठवाड्यात आज बुधवारी (ता. 06) विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा त्यात समावेश आहे.

Aftermath of Typhoon Michaung; Rain warning today in Marathwada along with Vidarbha

मिचौंग चक्रीवादळामुळे तमिळनाडूत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून, रहिवाश घरांसह वाहने तसेच हजारो एकरावरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मिचौंगच्या तडाक्यामुळे बंद पडलेली चेनैईची विमानसेवा आता सुरळीत झालेली असली तरी अजुनही 50 पेक्षा जास्त फ्लाईट रद्दच आहेत. याशिवाय रेल्वेच्या 200 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नैऋत्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता विरून गेली आहे. चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर धडकून जमिनीवर पोहोचल्यानंतर त्याची तीव्रता सुद्धा कमी झाली आहे. सदरचे वादळ आता उत्तरेकडे देखील सरकले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात आता पावसाळी वातावरणाची निर्मिती होऊन आकाशातील ढगांची गर्दी वाढली आहे. वातावरणातील गारठा त्यामुळे कमी झाला असून, सर्वत्र उकाडा वाढल्याचे चित्र आहे. होती नव्हती तेवढी थंडी सुद्धा गायब झाली आहे. रब्बी पिकांना आवश्यक असलेली थंडी कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे.

WhatsApp Group
Previous articleनंदुरबार जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देणार : डॉ. विजयकुमार गावित
Next articleवर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर; विदर्भ-मराठवाडा अंतर कमी होणार