Jain Hills Agriculture Festival : जळगाव येथील जैन हिल्सवर सध्या सुरू असलेल्या हायटेक कृषी महोत्सवाला मॉरिशसच्या शेतकऱ्यांनी भेट देऊन सुरुवातीलाच चार चाँद लावले. या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनावरील ऊस लागवड व उत्पादनाचे तंज्ञ तज्ज्ञांकडून समजून घेतले.
Visit of Mauritian farmers to Agriculture Festival at Jain Hills, Jalgaon
उसाचे अधिक उत्पादन घेऊन त्यापासून आर्थिक नफा मिळण्याकरीता ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी केला पाहीजे. ठिबक सिंचनाद्वारे पाणी व पाण्यात विरघळणारी खते ऊस पिकांस दिल्याने उत्पादन तर वाढतेच तसेच साखर उतारा देखील वाढतो. ड्रीप फर्टिगेशनमुळे पाण्याची व खर्चाची बचत होऊन उत्पादन दुप्पट होते. कारण ड्रीप इरिगेशनने उसाच्या मूळांजवळ पाणी व खते दिली जातात. त्यामुळे पिकाची उत्तम वाढ होते. मॉरिशसमध्ये ऊसाची शेती होते. पण उसाचे पाटपाणी पद्धतीवर एकरी 25 ते 30 टन, सेंट्रल पिवट तुषारवर एकरी 45 ते 50 टन आणि ड्रीप इरीगेशनवर एकरी पाटपाणी पद्धतीपेक्षा दुप्पट म्हणजे एकरी 60 ते 65 टन उसाचे उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनीही उसासह प्रत्येक पिकात ड्रीप इरिगेशनसह तंत्रज्ञानाचा वापर करावा. जैन कृषी महोत्सवातून ज्ञानार्जन करावे, असे आवाहन मॉरिशेस देशातील पोर्ट लुईस येथील प्रगतशील शेतकरी व जैन इरिगेशनचे वितरक विकास कोबल्लोल यांनी केले. त्यांनी स्वतः उसाच्या शेतीसह कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्मचा वापर करून लागवड केलेली आहे.
जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवातील क्षेत्रीय भेटी प्रसंगी कोबल्लोल बोलत होते. हायटेक शेतीचा नवा हुंकार असलेल्या जैन हिल्सला ठिबक संच उसाची रोप लागवड करून ठिबक व फर्टीगेशन तंत्राचा वापर केला आहे. तापमान वाढीवर नियंत्रणासाठी रेनपोर्ट स्प्रिंकलर यंत्रणा बसविली आहे. जैन हिल्सच्या कृषी महोत्सवात असलेल्या ऊस शेतीचा अभ्यास करून त्यापद्धतीने शेती करावी. यातून शेतकऱ्यांना उन्नतीचा मार्ग मिळेल, असेही ते श्री. कोबल्लोल यांनी स्पष्ट केले. त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, सतिश जोशी उपस्थित होते.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)