मुंबई बाजार समितीत ज्वारीला 7500 रू. प्रतिक्विंटल मिळाला भाव

Agriculture News : राज्यात प्रामुख्याने रब्बी हंगामात उत्पादित होणाऱ्या ज्वारीला अलिकडे बाराही महिने ग्राहकांची मागणी राहू लागली आहे. मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत पुणे व मुंबईत त्यामुळे ज्वारीला सध्या 7000 ते 7500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला सुद्धा आहे. ज्वारीच्या भावातील ही तेजी नवीन माल येईपर्यंत कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होईल.

7500 for jowar in Mumbai market committee. Price received per quintal

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी (ता.13 डिसेंबर) राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुमारे 1279 क्विंटल मालदांडी, हायब्रीड, शाळू प्रकारातील ज्वारीची आवक झाली होती. पैकी मालदांडी ज्वारीला सर्वाधिक भाव बाजार समित्यांमध्ये मिळाला. मुंबईत लोकल ज्वारीची 403 क्विंटल आवक होऊन 3500 ते 7500 रूपये, सरासरी 5500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पुण्यातही मालदांडी ज्वारीची 668 क्विंटल आवक होऊन 5800 ते 7000 रूपये आणि सरासरी 6400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जालन्यात मालदांडी ज्वारीची 21 क्विंटल आवक झाली आणि 2500 ते 5276 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सोलापुरात पांढऱ्या ज्वारीची 15 क्विंटल आवक होऊन सरासरी 5600 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बीडमध्येही रब्बी ज्वारीची 77 क्विंटल आवक होऊन 3500 ते 4200 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सांगलीत शाळू ज्वारीची 24 क्विंटल आवक होऊन 3560 ते 4030 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. बीडमध्ये पिवळ्या ज्वारीची 5 क्विंटल आवक झाली आणि 5000 ते 5500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

हायब्रीड ज्वारीला असा मिळाला भाव
बुधवारी (ता.13) नंदुरबार येथील बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची 54 क्विंटल आवक झाली आणि तिला 2892 ते 3081 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यवतमाळ बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची फक्त 2 क्विंटल आवक झाली आणि तिला सरासरी 2400 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. अमरावतीमध्ये ज्वारीची 3 क्विंटल आवक होऊन 2350 ते 2500 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleसाखरेचे दर पडू लागल्याने कारखान्यांना आणखी मोठा धक्का
Next articleमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीच्या भावात मोठे चढउतार