Banana Market Rate : मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसात विशेषतः कच्च्या केळीच्या आवकेत आणि बाजारभावात मोठे चढउतार अनुभवण्यास मिळाले आहेत. तरीही मुंबईत कच्ची केळी राज्यातील इतर ठिकाणच्या बाजार समित्यांपेक्षा चांगला भाव खाताना दिसत आहे.
Large fluctuations in banana prices in Mumbai Agricultural Produce Market Committee
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या केळीची आवक तशी फार जास्त नाही. परंतु, मागणीचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने केळीचे बाजारभाव तिथे काहीअंशी दबावातच आहेत. आठवडाभरापूर्वी म्हणजेच 05 डिसेंबर रोजी मुंबईत केळीची 113 क्विंटल आवक झाली होती आणि 1200 ते 2000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र पुढचे काही दिवस केळीचे भाव चांगलेच तेजीत आले होते. 06 डिसेंबरला केळीची 48 क्विंटल आवक झाली होती आणि 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. 07 डिसेंबरलाही केळीची 101 क्विंटल आवक झाली होती आणि केळीला 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. 08 डिसेंबरला पुन्हा आवक वाढून 164 क्विंटलपर्यंत पोहोचली होती, तरीही केळीला मुंबईत 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटल भाव कायम होता. 09 डिसेंबरला मात्र फक्त 16 क्विंटल आवक झाल्याने भावात सुधारणा होऊन केळीला मुंबईत 2100 ते 3100 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. 11 डिसेंबरला पुन्हा आवक वाढून 191 क्विंटलपर्यंत गेली होती, तरीही केळीला तिथे 2200 ते 3200 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. 12 डिसेंबरला पुन्हा केळीची आवक घटून 42 क्विंटलपर्यंत खाली आली होती. मात्र, भाव 2500 ते 3500 रूपये प्रतिक्विंटल मिळाला होता. आठवडाभरातील तेजीचे चित्र लक्षात घेता बुधवारी (ता.13 डिसेंबर) फक्त 51 क्विंटल आवक झाल्यानंतरही मुंबईत केळीला जेमतेम 1800 ते 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.