मुंबई, पुण्यात उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना शासन दरवर्षी देणार 60 हजार

Government Scheme : अनेक विद्यार्थ्यांना गावाकडे शिक्षणाची पुरेशी सोय नाही म्हणून उच्चशिक्षणासाठी घरापासून दूर शहरांमध्ये राहावे लागते. ओबीसी तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश न मिळाल्यास आता शासन थेट रोख रकमेचा लाभ देणार आहे. त्यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यात येणार आहे.

60,000 will be given annually by the government to OBC students pursuing higher education in Mumbai, Pune

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर येथे उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे 60 हजार रूपये तसेच क वर्ग महापालिका क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51 हजार रूपये, जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना 43 हजार रूपये तर तालुक्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 38 हजार रूपयांचा थेट लाभ देण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर सदरची योजना राबविली जाणार आहे. इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या महत्वाकांक्षी योजनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यातून 600 विद्यार्थ्यांना, याप्रमाणे राज्यातील 21,600 गरजू विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे योजना राबविण्याासाठी शासनाने सुमारे 100 कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

बँक खात्यात जमा होणार लाभाची रक्कम
भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करण्याची तरतूद केली जाणार आहे. ओबीसी तसेच एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेमुळे मोठा आधार मिळेल, असे मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी योजनेबद्दलची माहिती देताना सांगितले.

WhatsApp Group
Previous articleउद्या गुरूवारी (ता.14 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next article‘माविम’च्या महिला बचतगटांनाही फिरता निधी देण्यासाठी हालचाली सुरू