दक्षिण भारतातील ‘या’ दोन राज्यांमध्ये तुफान पाऊस, शाळांना सुटी जाहीर

Heavy Rain In Tamilnadu : दक्षिण भारतातील दोन राज्यात गेल्या 24 तासात ढगफुटी सदृश्य तुफान पावसाने हजेरी लावून चांगलाच धुमाकूळ घातल्याचे वृत्त आहे. तमिळनाडू आणि केरळ राज्यांचा त्यात समावेश आहे. विशेषतः तमिळनाडूमध्ये या पावसामुळे लहान व मोठ्या नद्यांना मोठे पूर आले असून, जनजीवन विस्कळीत झाल्याने तेथील प्रशासनाने चार जिल्ह्यातील शाळांना तसेच कार्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

Torrential rains in these two states of South India, holidays declared for schools

काही दिवसांपूर्वीच धडकलेल्या मिचौंग वादळामुळे आधीच तमिळनाडूतील चेनैई शहरात कधीही भरून न निघणारे नुकसान झाले होते. त्यातून सावरत नाही तेवढ्यात आता पुन्हा अवकाळी पावसाने तडाका दिल्याने तेथील नागरिक आणि प्रशासन चांगलेच हादरले आहे. ढगफुटीप्रमाणे झालेल्या पावसामुळे तमिळनाडुच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांमधील तलाव आता ओसंडून वाहत आहेत तसेच नद्यांना मोठे पूर आल्याने अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. शासनाने एनडीआरफ तसेच एसडीआरएफचे सुमारे 250 जवान नागरिकांच्या मदतीसाठी तैनात केले आहेत. हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, थुथुकुडी जिल्ह्यातील श्रीवैकुंटम तालुक्यात रविवारी सुमारे 525 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. याशिवाय पल्यामकोट्टईच्या काही जिल्ह्यांमध्ये रविवारी सायंकाळपर्यंत तब्बल 260 मिलीमीटर पाऊस पडला होता. सोमवारी (ता.18) सकाळी आणखी 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरूचेंदूरमध्येही 15 तासात दोन फूट पाऊस झाला. दरम्यान, प्रशासनाने कन्याकुमारी तसेच तेनकासी, थुथुकुडी, तिरूनेलवेली या चार जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली असून, एका आदेशान्वये शासकीय व खासगी कार्यालये तसेच बँकांचे व्यवहार देखील बंद केले आहेत. पूरस्थिती आटोक्यात येत नाही तोपर्यंत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील तेथील प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

WhatsApp Group
Previous articleभाववाढीच्या आशेने घरात कापूस भरून ठेवणारे शेतकरी व्यापाऱ्यांनी पकडले कोंडीत
Next articleBanana Market Rate : उद्या मंगळवारी (ता.19 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव