जळगाव जिल्ह्यातील 1049 घरकुलांसाठी सुमारे 13 कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी

Government Scheme : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 1049 वैयक्तिक घरकूल लाभार्थींच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता देऊन सुमारे 13 कोटी 9 लाख रूपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यापैकी 3 कोटी 28 लाख रूपयांचा निधी लगेच वितरीत करण्यात येत असून, उर्वरित निधी योजनेंतर्गत उपलब्ध निधीनुसार देण्यात येणार आहे.

Sanctioned funds of about 13 crore rupees for 1049 households in Jalgaon district

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकूल योजना शासनाकडून राबविली जाते. या योजनेतील तुरतुदीनुसार जळगाव येथील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकूल योजना जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या वैयक्तिक घरकूल लाभार्थींचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने सन 2023/24 करीता जळगाव जिल्ह्यातील 1049 घरकूल लाभार्थींना कार्योत्तर मान्यता आणि प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये याप्रमाणे 12 कोटी 58 लाख 80 हजार रूपये तसेच 4 टक्के प्रशासकीय निधीसाठी 50 लाख 35 हजार, अशा एकूण 13 कोटी 9 लाख रूपयांच्या निधीला शासनाची मान्यता मिळाली आहे.

घरकूल लाभार्थींना असा मिळणार योजनेचा लाभ
■ जळगाव येथील जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरविलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थींपैकी फक्त सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ मध्ये नमूद पात्र लाभार्थींनाच घरकूल योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
■ सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून, अशाच व्यक्तीला सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.
■ ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहील. दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
■ या योजनेंतर्गत लाभार्थींना सन 2022/23 या वर्षाचा उत्पन्नाचा दाखल सादर करणे आवश्यक राहील.
■ सर्व लाभार्थींना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
■ सदर लाभार्थींच्या कागदपत्रांची व अटींची पूर्तता झाल्याची खात्री करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व सहाय्यक समाजकल्याण आयुक्तांची असेल. अटी व शर्थींच्या पूर्ततेशिवाय कोणताच निधी खर्च होणार नाही.

WhatsApp Group
Previous articleBanana Market Rate : उद्या मंगळवारी (ता.19 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleजळगाव जिल्ह्यात 27 नवीन रूग्णवाहिका दाखल होणार, पालकमंत्र्यांची मंजुरी