जाणून घ्या, मुंबई बाजार समितीत सध्या कसे आहेत केळीचे भाव ?

Banana Market Rate : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रमुख मानल्या जाणाऱ्या मुंबई येथील बाजार समितीत सध्या कच्च्या केळीची आवक खूपच अस्थिर झाली आहे. त्यातही सध्या जेवढी काही केळीची दैनंदिन आवक होत आहे, त्यास फार जास्त उठाव नसल्याने भाव देखील बरेच नरमले आहेत. आज आपण मुंबईतील केळीची आवक आणि बाजारभावाचा साप्ताहिक आढावा घेणार आहोत.

Know, how are the prices of bananas in the Mumbai market committee?

महाराष्ट् राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबई बाजार समितीत 11 डिसेंबरला केळीची 191 क्विंटल आवक झाली होती आणि भाव 2200 ते 3200, सरासरी 2700 रूपये प्रतिक्विंटल होता. 12 डिसेंबरला केळीची आवक घटून 42 क्विंटलपर्यंत खालावली होती. त्यामुळे भाव सुधारून 2500 ते 3500, सरासरी 3000 रूपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. 13 डिसेंबरला पुन्हा केळीची आवक कमी म्हणजे 51 क्विंटलपर्यंतच झाली होती, तरीही केळीचे भाव कमी होऊन 1800 ते 2000 रूपये प्रतिक्विंटल दरम्यान स्थिरावले होते. दरम्यान, 15 डिसेंबरला मुंबईत केळीची जेमतेम 21 क्विंटल आवक झाली होती. या दिवशी मागणीनुसार पुरवठा नसल्याने अर्थातच केळीच्या भावात तेजी निर्माण होऊन ते 2400 ते 2800 रूपये प्रतिक्विंटल झाले होते. दुसऱ्या दिवशी 16 डिसेंबरला देखील 92 क्विंटल आवक होऊन केळीचे भाव 2400 ते 2800 रूपये प्रतिक्विंटल दरम्यान कायम होते. त्यानंतर मात्र केळीच्या भावात मोठी पडझड अनुभवण्यास मिळाली. 18 डिसेंबरला केळीची 177 क्विंटल आवक झाली होती आणि केळीला 1400 ते 1800, सरासरी 1600 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. सोमवारी (ता.19 डिसेंबर) सुद्धा केळीची आवक पुन्हा कमी होऊन 42 क्विंटलपर्यंत खाली आली होती. तरीही केळीला 1400 ते 2000, सरासरी 1700 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleविदर्भ गारठला, गोंदियासह यवतमाळ जिल्ह्यांचा पारा 9.0 अंशापर्यंत खालावला
Next articleधुळे जिल्ह्यातील 2.5 लाख शेतकऱ्यांसाठी 69 कोटी रूपये अग्रीम पीकविमा रक्कम मंजूर