जळगाव । गावशिवार न्यूज । महिनाभरापूर्वी सुमारे दीडशे रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा टोमॅटो आज किरकोळ बाजारात 10 रुपये किलोप्रमाणे विकला जातो आहे. राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सद्यःस्थितीत टोमॅटोची आवक जेमतेमच आहे, त्यानंतरही त्याचे भाव अचानकपणे गडगडल्याने उत्पादक शेतकरी खूपच हतबल झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 29 स्पटेंबर) जळगाव येथील बाजार समितीत टोमॅटोची फक्त 60 क्विंटल आवक झाली, त्यास 400 ते 700 रुपये आणि सरासरी 600 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. सोलापुरात 153 क्विंटल आवक झाली, त्यास 150 ते 500 रुपये आणि सरासरी 300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. रत्नागिरीत टोमॅटोची 24 क्विंटल आवक झाली, त्यास 900 ते 1000 रुपये आणि सरासरी 950 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मंगळवेढ्यात 63 क्विंटल आवक झाली, त्यास 100 ते 500 रुपये आणि सरासरी 400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुण्यातील पिंपरी येथे 49 क्विंटल आवक झाली, त्यास 700 ते 800 आणि सरासरी 750 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. राहता येथे 44 क्विंटल आवक झाली, त्यास 300 ते 700 रुपये आणि सरासरी 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. श्रीरामपुरात 21 क्विंटल आवक झाली, त्यास 300 ते 700 रुपये आणि 500 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मंचरमध्ये फक्त 4 क्विंटल आवक झाली, मागणीनुसार पुरवठा नसल्याने तिथे टोमॅटोला 1000 ते 1800 आणि सरासरी 1400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. संगमनेरात जास्त प्रमाणात म्हणजे 3080 क्विंटलपर्यंत आवक झाली, त्यास 100 ते 450 रुपये आणि सरासरी 275 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. चंद्रपूर- गंजवड येथे टोमॅटोची 644 क्विंटल आवक झाली, त्यास 600 ते 1000 रुपये आणि सरासरी 800 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.