Weather Update : हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भासह मराठवाडा तसेच खान्देशातील जळगाव, धुळे जिल्हा वगळता उर्वरित राज्यातील थंडी काहीअंशी कमी झाली आहे. ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यानंतर विशेषत्वाने थंडीचा कडाका कमी झाला असून, कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल व किमान तापमानात वाढ देखील झाली आहे. दरम्यान, आकाश आभ्राच्छादित झाल्याचे पाहून शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
शुक्रवारी (ता. 22 डिसेंबर) सकाळपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अहमदनगर- 29.0/12.5, जळगाव- 28.5/10.0, कोल्हापूर- 29.4/17.2, महाबळेश्वर- 28.1/15.9, मालेगाव- 26.8/15.8, सांगली- 29.6/17.7, सातारा- 31.5/15.3, सोलापूर- 31.6/14.1, अकोला- 29.9/14.6, अमरावती- 28.6/12.8, बुलडाणा- 29.5/14.4, चंद्रपूर- 27.8/10.8, गडचिरोली- 26.0/9.4, गोंदिया- 26.8/9.5, नागपूर- 27.2/11.5, वर्धा- 27.5/12.0, वाशिम- 30.0/12.2, यवतमाळ- 30.0/10.5, छत्रपती संभाजीनगर- 28.4/12.9, बीड- 27.1/12.5, परभणी- 28.4/12.0, डहाणू- 31.2/21.1, मुंबई- 33.1/21.9, रत्नागिरी- 35.4/21.6