जाणून घ्या, राज्यात कसे आहेत सध्या कापसाचे बाजारभाव ?

Cotton Market Rate : राज्यातील विविध ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या नव्या हंगामातील कापसाची आवक अपवाद वगळता सर्वसाधारणच आहे. त्यातही सध्या जेवढी काही आवक कापसाची होत आहे, त्यास मिळणारे भाव काहीअंशी दबावातच आहे. काही ठिकाणी तर ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत.

Know, how are the current market prices of cotton in the state?

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता.23 डिसेंबर) दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यभरात कापसाची सुमारे 16 हजार 263 क्विंटल आवक झाली होती. पैकी वर्ध्यात सर्वाधिक 8000 क्विंटल मध्यम धागा कापसाची आवक झाली होती आणि त्यास 6000 ते 7145, सरासरी 6500 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. याशिवाय लांब धागा कापसाची 1650 क्विंटल आवक झाली होती, त्यास 6450 ते 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. नागपूरमध्येही कापसाची 3000 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 6650 ते 6675 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. बुलडाण्यात कापसाची 2371 क्विंटल आवक झाली होती आणि त्यास 6000 ते 7080 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. अहमदनगरमध्ये 100 क्विंटल आवक झाली होती, 5000 ते 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. अकोल्यात कापसाची 198 क्विंटल आवक झाली आणि त्यास 6632 ते 7231 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. छत्रपती संभाजीनगरात 325 क्विंटल आवक झाली, त्यास 6800 ते 7000 रूपये प्रतिक्विंटल भाव होता. नांदेडमध्ये 52 क्विंटल आवक झाली, त्यास 6600 ते 6800 रूपये प्रतिक्विंटल भाव होता.

WhatsApp Group
Previous articleजळगावच्या जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिनी भरला जगाच्या पोशिंद्यांचा मेळा
Next articleउद्या रविवारी (ता. 24 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव