Dr.Punjabrao Deshmukh : देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा विशेष सन्मान 27 डिसेंबरला त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त भारत सरकार करणार आहे. त्यासाठी 125 रुपयांचे नाणे जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या संदर्भातील अधिकृत राजपत्र देखील प्रसिद्ध झाले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनीही अमरावती येथील पत्रकार परिषदेत त्यास दुजोरा दिला.
25 rupees coin will be introduced on the occasion of Dr.Punjabrao Deshmukh’s birth anniversary
देशाला कृषी क्षेत्रात अग्रेसर बनविण्यात पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय कृषी शिक्षण व त्यासंबंधी विविध क्षेत्रात भाऊसाहेबांनी उल्लेखनीय कार्य केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचा घटना समितीमध्येही सक्रीय सहभाग राहिला होता. त्यांच्या कार्यापासून नवीन पिढीला सातत्याने प्रेरणा मिळत राहावी म्हणून एक नाणे भारत सरकारने जारी करावे, यासाठी आमचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्यास अखेर यश आले आहे. भाऊसाहेबांच्या नावाने देशात 125 रूपयांचे नाणे प्रचलित होणे खूप गौरवास्पद आहे, असेही श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी नमूद केले. येत्या 27 डिसेंबरला भाऊसाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 125 रूपयांचे नाणे चलनात आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली आहे. त्यासंदर्भात अधिसूचना करणारे राजपत्र 21 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आले आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)