ढगाळ वातावरण निवळल्यानंतर राज्यात थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता

गावशिवार न्यूज | पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती झाल्याने राज्यातील थंडीचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी झाले होते. मात्र, कमी दाबाचा पट्टा विरल्याने आता ढगाळ वातावरण काहीअंशी निवळले असून थंडीचे पुनरागमन होण्याची शक्यता बळावली आहे. रात्रीच्या किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचे संकेत हवामान विभागाने देखील दिले आहेत. (Weather Update)

गुरूवारी (ता.11 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
अहमदनगर- 25.9/15.4, जळगाव- 28.5/16.1, कोल्हापूर- 27.3/19.1, महाबळेश्वर- 23.1/15.0, मालेगाव- 28.4/19.0, नाशिक- 29.0/17.8, सांगली- 26.5/18.7, सातारा- 25.2/17.4, सोलापूर- 29.0/19.4, अकोला- 26.8/17.0, अमरावती- 28.8/16.7, बुलडाणा- 25.7/17.0, चंद्रपूर- 30.0/17.0, गडचिरोली- 28.0/16.4, गोंदिया- 29.2/15.2, नागपूर- 30.1/17.4, वर्धा- 30.5/17.4, वाशिम- 31.2/15.2, यवतमाळ- 32.5/15.5, नांदेड- 30.8/19.0, परभणी- 30.2/17.5, डहाणू- 28.4/20.6, मुंबई- 29.5/23.2, रत्नागिरी- 31.1/23.7

WhatsApp Group
Previous articleशासनाकडून शेतकऱ्यांना दीड वर्षात सुमारे 44 हजार कोटी रूपयांची मदत
Next articleजाणून घ्या, गुजरातमध्ये सध्या कसे आहेत कच्च्या केळीचे भाव ?