उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमानात झाली दोन ते तीन अंशाने घट

गावशिवार न्यूज | हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली आहे. कोकण किनारपट्टीचा भाग वगळता उर्वरित जिल्ह्यातही कमी अधिक फरकाने तापमानात घट झाली असून, थंडीचा गारठा त्यामुळे हळूहळू वाढत आहे. (Weather Update )

रविवारी (ता.14 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस)
जळगाव- 32.5/16.7, कोल्हापूर- 32.3/18.5, महाबळेश्वर- 27.6/15.5, मालेगाव- 32.4/19.0, नाशिक- 32.3/15.4, पुणे- 28.5/15.4, सांगली- 32.9/17.2, सातारा- 32.2/15.8, सोलापूर- 34.1/18.6, अकोला- 32.6/16.7, अमरावती- 30.6/16.4, बुलडाणा- 31.0/17.0, चंद्रपूर- 31.6/16.0, गडचिरोली- 30.2/16.4, गोंदिया- 30.2/16.0, नागपूर- 31.1/16.2, वर्धा- 31.5/16.5, वाशिम- 32.2/14.6, यवतमाळ- 31.8/15.2, छत्रपती संभाजीनगर- 31.0/16.4, नांदेड- 31.6/17.8, परभणी- 32.4/17.0, डहाणू- 28.6/18.6, मुंबई- 33.8/22.6, रत्नागिरी- 34.1/21.1

WhatsApp Group
Previous articleबारामतीत 18 जानेवारीपासून प्रात्यक्षिकावर आधारीत कृषिक प्रदर्शनाचे आयोजन
Next articleशेळ्यांपेक्षा बोकडपालन फायदेशीर…तरूण दरवर्षी कसा कमावतो 50 लाख ?