जाणून घ्या, सुरत येथील बाजार समितीत सध्या कसे आहेत केळीचे दर ?

गावशिवार न्यूज | गुजरात राज्यातील सुरत येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या सप्ताहात आवक झालेल्या कच्च्या केळीचे दर स्थिरच होते. त्याठिकाणी केळीच्या दरात काही दिवसांपासून कोणताही चढउतार दिसून आलेला नसून, सरासरी 1500 रूपये प्रति क्विंटलचा दर केळीला मिळाला आहे. (Banana Market Rate)

सुरत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 08 जानेवारीपासून ते 15 जानेवारीपर्यंतच्या कालावधीत केळीला मिळालेल्या दरावर कटाक्ष टाकल्यानंतर कच्च्या केळीला किमान 1000 रूपये, कमाल 2000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यात कोणतीही घट अथवा वाढ झाल्याचे निदर्शनास आलेले नाही. दरम्यान, थंडीच्या प्रभावाचा फारसा परिणाम देखील केळीच्या मागणीवर झालेला नाही, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

WhatsApp Group
Previous articleउत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला, जळगावमध्ये 9.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Next articleकेंद्राकडून उसाच्या मळीवर 50 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय