सेंद्रिय शेतीवर शुक्रवारी कार्यशाळा, शरद पवारांची खास उपस्थिती

गावशिवार न्यूज | शेती उत्पादनांमध्ये आढळून येत असलेल्या रासानयिक घटकांमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्याने ग्राहक देखील आता विषमुक्त सेंद्रिय उत्पादनांची मागणी करू लागले आहेत. यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे शुक्रवारी (ता.19 जानेवारी) सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांची खास उपस्थिती त्याठिकाणी असणार आहे. ( Organic farming)

महाऑरगॅनिक अँड रेसीड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनच्या (मोर्फा) यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती कार्यशाळेचे शुक्रवारी दुपारी दीड वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल. गोपणबाई विहिरीसमोरील सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्टमध्ये सदरची कार्यशाळा होईल. खासदार शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, ‘मोर्फा’चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांची कार्यशाळेला उपस्थिती राहणार आहेत. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी उत्पादक शेतकरी व ग्राहक यांच्यात समन्वय साधणे गरजेचे आहे. त्याशिवाय सेंद्रिय शेती उत्पादनांना चांगले मार्केट मिळू शकणार नाही. त्यासाठीच मंगळवेढ्यात सेंद्रिय शेती कार्यशाळेचे आयोजन केले आहे. त्यात माजी केंद्रिय कृषिमंत्री शरद पवार यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती ॲड. भारत पवार आणि हरिभाऊ यादव यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

WhatsApp Group
Previous articleजळगाव जिल्ह्यात थंडीची लाट, बुधवारी सकाळी 9.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Next articleमुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीच्या दरात पुन्हा तेजी…!