जालना येथील बाजार समितीत तुरीला मिळाला सर्वाधिक भाव

गावशिवार न्यूज | तूर पिकाच्या काढणीला राज्यभरात आता वेग आला असून, ठिकठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक देखील वाढली आहे. दरम्यान, नवीन हंगामातील तुरीला बुधवारी (ता.17 जानेवारी) जालन्यात सर्वाधिक 10060 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. (Tur Market)

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात बुधवारी जालन्यात तुरीची सुमारे 3292 क्विंटल आवक होऊन 5500 ते 10060, सरासरी 9500 रूपये प्रति क्विंटल भाव होता. याशिवाय पांढकवडा येथे तुरीची 258 क्विंटल आवक झाली. त्याठिकाणी तुरीला 7000 ते 10000, सरासरी 8500 रूपये प्रति क्विंटल भाव होता. अक्कलकोट येथे 1475 क्विंटल आवक होऊन 9200 ते 9826, सरासरी 9600 रूपये प्रति क्विंटल भाव होता. वाशिम येथे 1500 क्विंटल आवक होऊन 7800 ते 9325, सरासरी 8500 रूपये प्रति क्विंटल भाव होता. चिखलीत 415 क्विंटल आवक होऊन 7700 ते 9432, सरासरी 8566 रूपये प्रति क्विंटल भाव होता. अकोल्यात तुरीची 903 क्विंटल आवक होऊन 6860 ते 9560, सरासरी 9000 रूपये प्रति क्विंटल भाव होता. हिंगोलीत 155 क्विंटल आवक होऊन 8800 ते 9430, सरासरी 9115 रूपये प्रति क्विंटल भाव होता. लातुरमध्ये तुरीची 10080 क्विंटल आवक होऊन 8801 ते 9601, सरासरी 9400 रूपये प्रति क्विंटल भाव होता. यवतमाळमध्ये 372 क्विंटल आवक होऊन 8500 ते 9380 रूपये प्रति क्विंटल भाव होता. आर्वीत 350 क्विंटल आवक होऊन 6500 ते 9200 रूपये प्रति क्विंटल भाव होता. नागपुरात तुरीची 2988 क्विंटल आवक होऊन 8000 ते 9070 रूपये प्रति क्विंटल भाव होता. जिंतुरमध्ये 315 क्विंटल आवक होऊन 8500 ते 9091 रूपये प्रति क्विंटल भाव होता. तुळजापुरात 40 क्विंटल आवक होऊन 8500 ते 9100 रूपये प्रति क्विंटल भाव होता. छत्रपती संभाजीनगरात 71 क्विंटल आवक होऊन 8099 ते 9245 रूपये प्रति क्विंटल भाव होता. गेवराईत 212 क्विंटल आवक होऊन 8500 ते 9490 रूपये प्रति क्विंटल भाव होता. औसात 80 क्विंटल आवक होऊन 9300 ते 9551 रूपये प्रति क्विंटल भाव होता.

WhatsApp Group
Previous article18 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना लागू शकतो इन्कम टॅक्स
Next articleमुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीचे दर नरमले