किमान तापमानात चढ-उतार सुरूच, थंडीचा गारठा कुठे कमी तर कुठे जास्त

गावशिवार न्यूज | राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सध्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून, थंडीचा गारठा कमी जास्त होताना दिसून आलेला आहे. हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार सोमवारी (ता. 29) सकाळपर्यंतच्या 24 तासात जळगाव जिल्ह्यात किमान तापमान हे 11.3 अंशापर्यंत खाली आले होते. उर्वरित जिल्ह्यांमधील किमान तापमान हे कमी अधिक फरकाने 12 ते 15 अंशाच्या दरम्यान होते. ( Weather Update)

सोमवारी (ता. 29 जानेवारी) सकाळी साडेआठपर्यंतच्या 24 तासातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव- 31.8/11.3, कोल्हापूर- 30.6/17.9, महाबळेश्वर- 26.3/15.2, मालेगाव- 30.2/14.2, नाशिक- 31.4/12.5, सांगली- 30.6/16.8, सातारा- 30.7/15.7, सोलापूर- 33.0/17.1, अकोला- 32.0/15.1, अमरावती- 30.6/13.7, बुलडाणा- 30.5/15.0, चंद्रपूर- 30.0/12.0, गडचिरोली- 28.6/13.0, गोंदिया- 29.2/11.6, नागपूर- 29.6/12.8, वर्धा- 30.0/13.6, वाशिम- 31.6/14.4, यवतमाळ- 27.0/15.2, नांदेड- 30.8/16.6, परभणी- 30.9/14.4, उदगीर- 31.5/15.0, डहाणू- 28.7/17.4, मुंबई- 33.0/21.0, रत्नागिरी- 34.5/20.2

WhatsApp Group
Previous articleजाणून घ्या, उन्हाळी लागवडीसाठी भुईमुगाचे कोणते वाण आहे फायदेशीर ?
Next articleमंगळवार (ता. 30 जानेवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव