कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून विकसित भारत घडविण्याचे स्वप्न पूर्ण होणार

गावशिवार न्यूज | कृषी हा आपल्या देशाचा मुख्य आधार असून, सुमारे 58 टक्के पेक्षा जास्त लोक कृषी क्षेत्राशी निगडीत आहेत. या क्षेत्राच्या भविष्याला आकार देण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका आगामी काळात महत्वाची असणार आहे. सन 2047 चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषी विद्यापीठ आणि त्यातून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्याने साकार करतील, असा विश्वास राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला. (Governor Ramesh Bais)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 37 व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभाग स्नातकांना राज्यपाल रमेश बैस यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. याप्रसंगी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिको कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले आणि नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद ही पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी ट्रस्ट फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल सायन्सेस (टास) चे अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे माजी सचिव तथा नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मभूषण डॉ. आर. एस. परोदा, कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, दापोली येथील डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉ. प्रदिप इंगोले, अधिष्ठाता (कृषी) डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशीव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्रीमती स्वाती निकम उपस्थित होते.

WhatsApp Group
Previous articleशेतकरी थेट अ‍ॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला शेतमाल विकणार
Next articleअंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना पाच फेब्रुवारीपासून मोफत साड्यांचे वाटप