अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना पाच फेब्रुवारीपासून मोफत साड्यांचे वाटप

गावशिवार न्यूज | कॅप्टिव्ह मार्केट योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक‎ कुटुंबातील महिलांना साडी वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग ‎महामंडळ मर्यादित यांच्या 25 ‎जानेवारीच्या पत्रानुसार प्रजासत्ताक‎दिन ते होळी या कालावधी दरम्यान संबंधित सर्व महिलांना मोफत साड्या ‎वाटप करण्यात येणार आहेत.‎ (Free Saree Shceme)

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय शिधापत्रिकाधारक सुमारे 24 लाख 58 हजार 747 कुटुंबातील महिलांना प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची मकरसंक्रांतीपासून अंमलबजावणी होणार असून, त्यासाठी पुरवणी योजनांमध्ये सुमारे 125 कोटी रूपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे. 365 रुपये किमतीच्या सिल्क आर्ट साड्यांमध्ये 5 रंगांचे पर्याय असतील आणि महिलांना रेशन दुकानावर प्रत्येकी एक साडी मिळेल.

लाभार्थी महिलांचा थंब घेतल्यानंतरच मोफत साड्यांचे वाटप केले जाणार
रेशन दुकानातील ई-पॉस मशिनवर लाभार्थी महिलांचा थंब घेतल्यानंतरच मोफत साड्यांचे वाटप केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या यादीनुसार‎ साड्यांचे गठ्ठे तयार करून रेशन दुकानाच्या नावानुसार सार्वजनिक वितरण ‎व्यवस्थेच्या तालुकास्तरीय गोदामापर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यानंतर रेशन ‎दुकानदारांना सदरचे गठ्ठे देण्यात येणार आहेत. या गठ्ठ्यांची नोंद ऑनलाइन ठेवली जाणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक असलेल्या कुटुंबातील एकाच‎ महिलेला ही मोफत साडी दिली जाणार आहे. साडी‎ वाटपापूर्वी रेशन दुकानात संबंधित महिलेचा ‎ई-पॉस मशिनवर थंब घेतल्यानंतरच ‎साडी दिली जाणार आहे.‎

WhatsApp Group
Previous articleकृषी विद्यापीठांच्या माध्यमातून विकसित भारत घडविण्याचे स्वप्न पूर्ण होणार
Next articleराज्यभर थंडीचा गारठा कायम, जळगावात 10.5 अंश सेल्सिअस तापमान