अमळनेर तालुक्यातील ‘या’ आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात होणार रूपांतर

गावशिवार न्यूज | महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याच्या एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे. सदर रूग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करून बांधकाम व पद निर्मिती करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीला शासनाकडून लवकरच चालना देण्यात येणार आहे. (Government Resolutions)

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे सद्यःस्थितीत सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार पातोंडा येथील आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात रूपांतर करण्यास विशेष बाब म्हणून शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तावित 30 खाटांच्या ग्रामीण रूग्णालयामुळे पातोंडा व परिसरातील ग्रामस्थांना अद्ययावत आरोग्य सुविधा आता मिळू शकतील. रुग्णांचा उपचारासाठी अमळनेर येथे जाण्याचा ताण देखील कमी होईल.

एरंडोल येथेही 20 खाटांचे ट्रामा केअर सेंटर
ग्रामीण रूग्णालय एरंडोल येथेही 20 खाटांचे ट्रामा केअर सेंटर स्थापन करण्यास विशेष बाब म्हणून शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. विहित पद्धतीने जागा अधिग्रहीत करून बांधकाम व पद निर्मिती करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीला शासनाकडून लवकरच चालना देण्यात येणार आहे

WhatsApp Group
Previous articleबुधवार (ता. 31 जानेवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleकृषी व ग्रामीण विकास बँकांच्या 1851 शाखांचे संगणकीकरण, पारदर्शकता वाढणार