दिल्लीतील आझादपूरच्या मंडीत केळीला मिळाला ‘इतका’ दर

गावशिवार न्यूज | कच्च्या केळीच्या दैनंदिन तसेच साप्ताहिक बाजारभावाची माहिती आपण नियमितपणे घेत असतो. आज आपण दिल्लीतील आझादपूरच्या मंडीत गेल्या सप्ताहात केळीला नेमका किती दर मिळाला होता, त्याची माहिती घेणार आहोत. प्राप्त माहितीनुसार आझादपूरमध्ये काही दिवसांपासून केळीचे दर हे जवळपास स्थिरच आहेत. त्यात कोणतीही दखलपात्र वाढ अथवा घट झाल्याचे दिसून आलेले नाही. सरासरी 2000-2400 रूपये प्रति क्विंटल दर तिथे केळीला मिळाला आहे. (Banana Rate)

आझादपूर मंडीतील केळीचे दर (प्रति क्विंटल)
➡️ 09 फेब्रू- 1000 ते 2500, सरासरी 2300 रूपये
➡️ 07 फेब्रू- 1000 ते 2500, सरासरी 2000 रूपये
➡️ 06 फेब्रू- 1000 ते 2500, सरासरी 2200 रूपये
➡️ 05 फेब्रू- 1000 ते 2500, सरासरी 2200 रूपये
➡️ 03 फेब्रू- 1000 ते 2500, सरासरी 2400 रूपये
➡️ 02 फेब्रू- 1000 ते 2500, सरासरी 2400 रूपये
➡️ 01 फेब्रू- 1000 ते 2500, सरासरी 2000 रूपये
➡️ 31 जाने- 1000 ते 2500, सरासरी 2200 रूपये
➡️ 30 जाने- 1000 ते 2500, सरासरी 2200 रूपये

WhatsApp Group
Previous articleगाव चलो अभियानातून कृषी कल्याणासाठी राबविलेल्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार
Next articleरविवार (ता. 11 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव