जळगावसह धुळे जिल्ह्यातील ‘या’ नवीन महसूल मंडळात दुष्काळी स्थिती जाहीर

Drought In Maharashtra : दुष्काळी परिस्थितीचा लाभ देण्यासाठी शासनाने यापूर्वी दुष्काळसदृश जाहीर केलेल्या महसूल मंडळांव्यतिरिक्त त्यात विभाजन करून नव्याने करण्यात आलेल्या मंडळातही दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. जळगावसह धुळे जिल्ह्यातील सुमारे 47 महसूल मंडळांचा त्यात समावेश आहे. दरम्यान, शासनाने नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश मंडळात सर्व सवलती तातडीने लागू केल्या आहेत.

नव्याने दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देण्यात येणार आहे. तसेच सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येणार आहे. कृषिपंपांच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट मिळणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात देखील माफी देण्यात येईल. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आणण्यात येईल. आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर केला जाईल. शेतीपंपांची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही.

दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर झालेल्या मंडळांची जिल्हानिहाय संख्या
धुळे- 23, जळगाव- 24, पुणे- 14, सातारा- 12, सांगली- 02, सोलापूर- 10, कोल्हापूर- 05, नाशिक- 13, नगर- 34, छत्रपती संभाजीनगर- 16, जालना- 03, परभणी- 13, हिंगोली- 07, नांदेड- 05, लातूर- 06, बीड- 19, धाराशिव- 10, नागपूर- 05, वर्धा- 03.

WhatsApp Group
Previous articleरविवार (ता. 18 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळी भाव
Next articleकेंद्र सरकारने ‘या’ अटीवर अखेर कांदा निर्यातबंदी हटवली