Cotton Rate : देशांतर्गत कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी काही दिवसांपासून हवालदिल झाले होते. मात्र, यथावकाश कापसाच्या दरात आता बऱ्यापैकी सुधारणा होताना दिसत आहे. गुजरात राज्यातील काही ठिकाणच्या बाजार समित्यांमध्येही कापसाला चांगले दर मिळू लागले आहेत. विशेषतः नरमा बीटी कापसाला तिथे किमान 6500 आणि कमाल 7715 रूपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे.
20 फेब्रुवारी : गुजरातमधील कापसाचे दर (प्रति क्विंटल)
● खंबा- 6060 ते 7300, सरासरी 6550 रूपये
● सावरकुंडला- 6500 ते 7715, सरासरी 7108 रूपये
● आमीरगड- 5655 ते 6825, सरासरी 6825 रूपये
● खंभालिया- 6500 ते 7275, सरासरी 6750 रूपये
● विसावदार- 5700 ते 7230, सरासरी 6465 रूपये
● उपलेटा- 6250 ते 7625, सरासरी 6937 रूपये
● लिमडी- 5505 ते 7545, सरासरी 6525 रूपये
● जंबुसर- 6100 ते 6500, सरासरी 6300 रूपये