मोदी सरकारचा मोठा निर्णय, उसाच्या एफआरपीमध्ये ‘इतकी’ वाढ

Agriculture News : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने साखर हंगाम 2024/25 साठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमत एफआरपीला 10.25 टक्के साखर पुनर्प्राप्ती दराने 340 रुपये प्रति क्विंटल या दराने मंजुरी दिली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित प्रत्येक संकल्प पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया प्रधानमंत्र्यांनी दिली.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चालू हंगामाच्या 2023/24 च्या उसाच्या एफआरपीपेक्षा सुमारे आठ टक्क्यांनी जास्त असलेला उसाचा हा ऐतिहासिक भाव आहे. यावर्षी एक ऑक्टोबरपासून सुधारित एफआरपी लागू होईल, असेही प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केले. कृषी खर्च आणि किमती आयोगाच्या (CACP) शिफारशींच्या आधारे आणि राज्य सरकारे आणि इतर भागधारकांशी सल्लामसलत केल्यानंतरच उसाची नवीन FRP निश्चित करण्यात आली आहे.

सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार गेल्या 10 वर्षांत मोदी सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य वेळी योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केले आहेत. मागील साखर हंगाम 2022/23 मधील 99.5 टक्के उसाची थकबाकी आणि सर्व इतर साखरेची 99.9% हंगामातील रक्कम अगोदरच शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. परिणामी साखर क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात कमी उसाची थकबाकी आहे.

WhatsApp Group
Previous articleनैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी 106 कोटींच्या निधीला मान्यता
Next articleशुक्रवार (ता. 23 फेब्रुवारी) बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव