Agriculture Award : राज्यात कृषी व संलग्न तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रदान करण्यात येणाऱ्या सन 2020/ 2021/ 2022 च्या पुरस्कारांची घोषणा शासनाने केली आहे. पुरस्कारार्थींची निवड विभागस्तरावरून करण्यात आली असून, पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी कृषी आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारात डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण सेंद्रिय शेती, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, उद्यानपंडित, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी (सर्वसाधारण व आदिवासी गट), पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्काराचा समावेश आहे.
आपल्या विभागातील पुरस्कारार्थींची नावे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जीआर पाहण्यासाठी : येथे क्लीक करा