Jalgaon news | जळगावमध्ये भाजीपाल्याची आवक नेहमीपेक्षा कमीच, भाव तेजीत

Jalgaon news | जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कांदा व बटाटा वगळता अन्य सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची आवक सद्यःस्थितीत नेहमीपेक्षा कमी आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा नसल्याने साहजिक भाजीपाल्याचे भाव तेजीतच असल्याचे दिसून आले आहे.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी (ता. 18 ऑक्टोबर) जळगावच्या बाजार समितीत कारल्याची 18 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. वांग्याची 38 क्विंटल आवक झाली, त्यास 800 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. कोबीची 37 क्विंटल आवक झाली, कोबीला 600 ते 1200 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. चवळी शेंगांची 8 क्विंटल आवक झाली, चवळीला 2000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. गवारची 5 क्विंटल आवक झाली, गवारला 3000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. कोथिंबिरीची 17 क्विंटल आवक झाली, तिला 2000 ते 5000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. काकडीची 15 क्विंटल आवक झाली, काकडीला 800 ते 1500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. फुलकोबीची 21 क्विंटल आवक झाली, तिला 1000 ते 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. आल्याची 90 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 6000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. हिरव्या मिरचीची 63 क्विंटल आवक झाली, मिरचीला 2000 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. ओल्या भुईमूंग शेंगांची 45 क्विंटल आवक झाली, शेंगांना 3500 ते 4500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. कांदा पातीची 2 क्विंटल आवक झाली, तिला सरासरी 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. भेंडीची 17 क्विंटल आवक झाली, तिला 1500 ते 2700 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. मेथीची 3 क्विंटल आवक झाली, तिला सरासरी 6000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. पालकाची 3 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 2700 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. वाल पापडीची 2 क्विंटल आवक झाली, तिला सरासरी 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. भोपळ्याची 5 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. टोमॅटोची 73 क्विंटल आवक झाली, त्यास 500 ते 1000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. मुळ्याची 2 क्विंटल आवक झाली, त्यास सरासरी 1000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. बटाट्याची 250 क्विंटल आवक झाली, त्यास 800 ते 1300 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. लाल कांद्याची 292 क्विंटल आवक झाली, कांद्याला 1150 ते 3400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता.

WhatsApp Group
Previous articleनाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला सरासरी 2400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव | onion market
Next articleApmc market | जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उडीद, मका, सोयाबीनची आवक वाढली