इथेनॉल बंदी आणि कांदा निर्यातीवर चर्चा करण्यासाठी अखेर अमित शहांनी वेळ दिली

Agriculture Breaking News : केंद्र सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मितीवर घालण्यात आलेली मर्यादा आणि कांदा निर्यातबंदी या दोन्ही निर्णयांमुळे राज्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने सोमवारी (ता.17) नवी दिल्लीत केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा आणि राज्य शासनाची महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असून, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Amit Shah finally gave time to discuss ethanol ban and onion export

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही अमित शहा आणि राज्य शासन यांच्या भेटीच्या वृत्ताला त्यास दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी उसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध शिथील केले असले तरी 17 लाख टनाची अट घालून ठेवली आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध सरसकट शिथील करण्याची मागणी लावून धरली आहे. राज्य सरकारनेही नव्या निर्णयातील काही त्रूटी केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. याशिवाय निर्यातबंदीमुळे राज्यात कांद्याचे भाव कोसळल्याने संबंधित सर्व शेतकरी नाराज झाले असून, ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने पुकारली गेली आहेत. इथेनॉल आणि कांदा या दोन विषयांमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून निघाल्यानंतर अर्थातच केंद्राचे मन वळविण्यासाठी राज्य शासनाकडून काही दिवसांपासून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार अखेर केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा यांनी भेटीची वेळ दिली आहे. त्यांच्यासोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यातील सहकारी साखर कारखाने तसेच ऊस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कैफियत मांडू शकणार आहेत. बैठकीत काय चर्चा होते आणि त्यानंतर केंद्र सरकार कोणता निर्णय घेते, त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group
Previous articleउद्या सोमवारी (ता.18 डिसेंबर) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगाव येथील केळीचे भाव
Next articleपिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे नागपूरहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते लोकार्पण