सौदर्य प्रसाधने, औषधी निर्मितीसाठी भारतीय हळदीला युरोप, अमेरिकेत मागणी

Agriculture Breaking News : भारतीय शेतकऱ्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या नैसर्गिक हळदीत कुरकुमिनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. याच कारणाने युरोप तसेच अमेरिकेतील सौंदर्य प्रसाधने व औषधी निर्मिती कंपन्यांकडून भारतात उत्पादन होणाऱ्या हळदीला गेल्या काही वर्षात मोठी मागणी राहिली आहे. भविष्यातही विदेशातील मागणीत सातत्य राहणार असल्याने विषमुक्त हळदीच्या निर्यातीला चांगली चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ‘एफआयएसएस’चे अध्यक्ष के.नायक यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.

Demand for Indian Turmeric in Europe, America for cosmetics, medicine manufacturing

केंद्र सरकारने हळद उत्पादनाला आणखी चालना देण्यासाठी नुकतीच हळद बोर्डाची स्थापना केली आहे. सदरचे बोर्ड हे केंद्र सरकार तसेच हळदीचे व्यापारी व हळद उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय साधण्याचे काम आता करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हळद लागवडीसाठी अग्रेसर असलेल्या सांगली जिल्ह्यात हळद उत्पादक, व्यापारी व अडत्यांसाठी खास परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेक होल्डर (एफआयएसएस) संघटनेचे अध्यक्ष के.नायक यांनी भविष्यातील हळदीच्या व्यापारातील संधीविषयी भाष्य केले. परिसंवादात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे तसेच कृषी सहसंचालक मनोजकुमार वेताळ आदी बरेच मान्यवर सहभागी झाले होते.

100 किलो हळदीपासून मिळते 4 किलो कुरकुमिन
कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर भारत देशात उत्पादित होणाऱ्या हळदीला देशासह विदेशातून खूप मोठी मागणी आहे. साधारण 100 किलो हळदीपासून 4 किलोपर्यंत कुरकुमिन घटकाचे उत्पादन मिळते. या कुरकुमिनचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधने आणि औषधींसाठी केला जातो. भविष्यात त्यामुळे भारतात सेंद्रिय पद्धतीने हळदीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच सोन्याचे दिवस येतील, असाही आशावाद फेडरेशन ऑफ इंडियन स्पाइस स्टेक होल्डर (एफआयएसएस) संघटनेचे अध्यक्ष के.नायक यांनी व्यक्त केला.

WhatsApp Group
Previous articleजळगावमध्ये सोमवारी सकाळी निच्चांकी 9.6 अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद
Next articleकारखान्यांना साखर भरण्यासाठी ज्यूटच्या बॅग वापरण्याची केंद्र सरकारची सक्ती