बारामतीत 18 जानेवारीपासून प्रात्यक्षिकावर आधारीत कृषिक प्रदर्शनाचे आयोजन

गावशिवार न्यूज | बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही 18 ते 22 जानेवारी दरम्यान कृषिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रात्यक्षिकांवर आधारीत असणाऱ्या या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना यंदा चीन, अमेरिका, इस्त्राईल, नेदरलँड यासारख्या देशांमध्ये वापरले जाणारे एआय आणि रोबोटीक तंत्रज्ञान, सेन्सर, ड्रोन अगदी जवळून पाहता येणार आहेत. (Agriculture Exhibition)

बारामती येथे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषिक प्रदर्शनात यंदा उसाच्या शेतीत केलेला कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर हे खास आकर्षण असणार आहे. याशिवाय जपानमधील बायोफ्लॉक यंत्रणा तसेच स्पेन, नेदरलँड, जर्मनी, थायलंड या देशातील सेंद्रिय शेती उत्पादनासाठी वापरली किटकनाशके, इस्त्राईलची ठिबक सिंचन प्रणाली, इटलीतील सेन्सरचलित मशिनरी तंत्रज्ञानाची माहिती देणारी दालने शेतकऱ्यांच्या ज्ञान वृद्धीला चालना देणार आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे प्रदर्शनात भाजीपाला गुणवत्ता केंद्र, नावीन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, पशुपक्षी प्रदर्शन, भरडधान्य, फुलशेती, देशी बियाण्यांच्या प्रात्यक्षिकांचा समावेश असणार आहे. ते पाहुन आपल्या शेतीत नवीन प्रयोग करण्याची ऊर्मी राज्यातील शेतकऱ्यांमध्ये निश्चितच निर्माण होईल, अशी आशा ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केली.

WhatsApp Group
Previous articleरविवारी (14 जानेवारी) असे राहतील बऱ्हाणपूर, रावेर, चोपडा, जळगावचे केळी भाव
Next articleउत्तर महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमानात झाली दोन ते तीन अंशाने घट