जळगावमध्ये सोयाबीनची आवक वाढली, भाव 4175 ते 4275 रूपये प्रतिक्विंटल | Agriculture market

Agriculture market | जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता सर्वदूर सोयाबीन पिकाच्या काढणीला चांगलाच वेग आला आहे. ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. 11) सोयाबीनची सुमारे 795 क्विंटल आवक झाली, त्यास 4175 ते 4275 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीची 125 क्विंटल आवक झाली, तिला 1906 ते 2300 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. गव्हाची 30 क्विंटल आवक झाली, त्यास 2350 ते 2750 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. संकरीत ज्वारीची 20 क्विंटल आवक झाली. या ज्वारीला 2661 ते 2900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. दादर ज्वारीची फक्त 9 क्विंटल आवक झाली, तिला 3700 ते 3900 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. पिवळ्या मक्याची 350 क्विंटल आवक झाली, त्यास 1570 ते 1933 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. लाल मक्याची 491 क्विंटल आवक झाली, त्यास 1296 ते 1767 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. चाफा हरभऱ्याची 25 क्विंटल आवक झाली, त्यास 4125 ते 4425 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. मुगाची 8 क्विंटल आवक झाली, त्यास 8501 ते 9650 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. उडीदाची 176 क्विंटल आवक झाली, त्यास 5300 ते 6850 रूपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

WhatsApp Group
Previous articleAPMC: जळगावच्या बाजार समितीत आवक घटल्याने सर्वच पालेभाज्यांचे दर तेजीत
Next articleशेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या ‘सह्याद्री फार्म्स’ची सुमारे १,००७ कोटी रुपयांची उलाढाल | Success story