कृषी व ग्रामीण विकास बँकांच्या 1851 शाखांचे संगणकीकरण, पारदर्शकता वाढणार

गावशिवार न्यूज | देशातील विविध राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील कृषी व ग्रामीण विकास बँका तसेच सहकारी सोसायट्यांचे निबंधक यांच्यासाठीच्या संगणकीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रिय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध राज्यातील 1200 पेक्षा अधिक अधिकारी उपस्थित होते. (Amit Shaha)

देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कृषी आणि ग्रामीण विकास बँकाच्या 1 हजार 851 शाखांचे संपूर्ण संगणकीकरण करून त्यांना एका समान सॉफ्टवेअरच्या सहाय्याने नाबार्डला जोडण्याचा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे, असे अमित शहा यांनी बोलून दाखविले. सहकार मंत्रालयाच्या या नव्या प्रयत्नामुळे कृषी व ग्रामीण विकास बँकांच्या कामकाजातील कार्यक्षमता, जबाबदारपणा आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. यामुळे व्यवहारातील अतिरिक्त खर्चाचे प्रमाण कमी होईल, शेतकऱ्यांनाअधिक सुलभपणे कर्जपुरवठा करणे शक्य होईल आणि योजनांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी वास्तवदर्शी माहितीसाठा उपलब्ध होऊन त्यावर लक्ष ठेवणे शक्य होईल, असे आशा केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केली. याचा फायदा या बँकांशी जोडल्या गेलेल्या छोट्या आणि असंघटित शेतकऱ्यांना प्राथमिक कृषी पतसंस्थामार्फत कर्ज आणि इतर संलग्न सेवा सहजपणे उपलब्ध होण्यासाठी होईल, असेही शहा यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group
Previous articleअमळनेर तालुक्यातील ‘या’ आरोग्य केंद्राचे ग्रामीण रूग्णालयात होणार रूपांतर
Next articleजळगावमध्ये बुधवारी सकाळी 10.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद