Amrit Bharat Express : रेल्वेने प्रवास करताना अनेकवेळा धक्क्यांचा अनुभव येतो. विशेषतः रेल्वे थांबताना किंवा गती पकडताना प्रवाशांना मोठे धक्के सहन करावे लागतात. मात्र, पुश आणि पूल तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या नवीन अमृत भारत एक्स्प्रेस रूळावर आल्यानंतर प्रवाशांना धक्के विरहीत प्रवासाचा सुखकर अनुभव घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 30 डिसेंबरला एकाचवेळी दोन अमृत भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होणार आहे.
Amrut Bharat Express, offering a seamless travel experience, will soon hit the tracks
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुश-पूल तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या अमृत भारत एक्स्प्रेस रेल्वेचं लवकरच लोकार्पण करणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वतः नवी दिल्लीत सांगितले. दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर नवनिर्मित पुश -पूल तंत्रज्ञानाचं निरीक्षण केल्यानंतर त्यांनी सदरची घोषणा केली. नवीन पुश आणि पूल तंत्रज्ञानामुळे स्थानकावरून पुढे मार्गस्थ होणारी रेल्वे खूप लवकर गती पकडते. त्यासोबतच पुढील स्थानकावर लवकर थांबवता देखील येते. यामुळे रेल्वे गाड्यांचा वेळ वाचवण्याबरोबरच प्रवाशांना धक्के विरहित सुखकर प्रवास करता येणार असल्याचेही रेल्वे मंत्री श्री. वैष्णव यांनी म्हटले आहे.
![](https://gavshivar.news/wp-content/uploads/2023/12/Thumbnail-85-jpg.webp)
पहिली अमृत भारत एक्स्प्रेस अयोध्या ते दरभंगा स्थानकांदरम्यान धावणार
भारतीय रेल्वेला अलिकडील काही वर्षात नवीन रंगरूप देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वंदे भारत एक्स्प्रेस देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत. त्यानंतर आता पुश आणि पूल तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली अमृत भारत एक्स्प्रेसची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते लोकार्पण होत असलेली ही एक्स्प्रेस राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी देशाच्या सेवेत समर्पित होणार आहे. पहिली अमृत भारत एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील अयोध्या ते बिहारमधील दरभंगा या दोन स्थानकांदरम्यान धावणार आहे. याशिवाय आणखी दुसरी अमृत भारत एक्स्प्रेस बंगळुरू ते मालदा या दोन स्थानकांदरम्यान चालविली जाणार आहे.
![WhatsApp Group WhatsApp Group](http://gavshivar.news/wp-content/uploads/2023/10/WhatsApp-Add.gif)