APMC: जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कोथिंबीर, मेथी, पालक, पोकळा यासारख्या पालेभाज्यांची आवक खूपच कमी झाली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा नसल्याच्या स्थितीत अर्थातच सर्व पालेभाज्यांचे दर तेजीतच असून, हिवाळ्यात लागवडीखालील क्षेत्र वाढल्यानंतर कदाचित पालेभाज्यांचे दर स्थिरावण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (फळे व भाजीपाला मार्केट) 8 ऑक्टोबरला कोथिंबीरीची फक्त 6 क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे कोथिंबिरीला किमान 8000 आणि कमाल 11000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीच्या भाजीची जेमतेम 3 क्विंटल आवक झाली होती. मेथीला 7500 ते 9000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पालकाची 2 क्विंटल आवक झाली, त्यास 4000 ते 5000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लिंबाची 31 क्विंटल आवक झाली, त्यास 3000 ते 5000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. बटाट्याची 76 क्विंटल आवक झाली, त्यास 1400 ते 1600 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. भेंडीची 14 क्विंटल आवक होऊन 3000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. फुलकोबीची 11 क्विंटल आवक होऊन 3000 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. गवारची फक्त 1 क्विंटल आवक झाली, तिला सरासरी 10000 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कारल्याची 8 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. पत्ताकोबीची 21 क्विंटल आवक होऊन 1000 ते 1500 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची 106 क्विंटल आवक झाली, त्यास 800 ते 1200 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. वांग्याची 50 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. हिरव्या मिरचीची 8 क्विंटल आवक झाली, मिरचीला 3000 ते 4500 रूपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.