मुंबई बाजार समितीत फळांचे भाव तेजीत, आवक मात्र सर्वसाधारण | Apmc

Apmc | राज्यात सर्वात मोठ्या मानल्या मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सफरचंद वगळता सीताफळ, संत्री, मोसंबी, डाळिंब, चिकू, कलिंगड, खरबूज, अननस, बोर, पेरू, लिंबू, पपई, केळी यासारख्या फळांची आवक सध्या सर्वसाधारणच आहे. मात्र, ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवठा नसल्याने सर्वच फळांचे भाव सध्या तेजीत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत महाराष्ट्रासह अन्य राज्यातून फळांची बारमाही आवक होत असते. त्यानुसार गुरुवारी (ता.12 ऑक्टोबर) सफरचंदाची सर्वाधिक 10,242 क्विंटल आवक झाली, सफरचंदास 8000 ते 13000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. कच्च्या केळीची 35 क्विंटल आवक झाली, केळीला 2500 ते 3000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. अननस फळाची 670 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 4500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. बोरांची 12 क्विंटल आवक झाली, त्यास 1500 ते 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. चिकुची 197 क्विंटल आवक झाली, त्यास 2500 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. डाळिंबाची 435 क्विंटल आवक झाली, त्यास 10,000 ते 15,000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. कलिंगडाची 2265 क्विंटल आवक झाली, त्यास 1200 ते 1700 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. लिंबाची 307 क्विंटल आवक झाली, त्यास 1000 ते 2000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. मोसंबीची 3200 क्विंटल आवक झाली, मोसंबीला 2200 ते 4000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. पपईची 1835 क्विंटल आवक झाली, पपईला 1500 ते 3500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. पेरूची 411 क्विंटल आवक झाली, त्यास 2500 ते 5000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. संत्र्याची 1310 क्विंटल आवक झाली, त्यास 2500 ते 5000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. सीताफळाची 540 क्विंटल आवक झाली, त्यास 6000 ते 10000 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता. खरबुजाची 625 क्विंटल आवक झाली, त्यास 2000 ते 2500 रूपये प्रतिक्विंटलचा भाव होता.

WhatsApp Group
Previous articleशेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या ‘सह्याद्री फार्म्स’ची सुमारे १,००७ कोटी रुपयांची उलाढाल | Success story
Next articleनाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याला सरासरी 2400 रूपये प्रतिक्विंटलचा भाव | onion market